https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जन्माच्या पूर्वीपासून ते मृत्यू पश्चात प्रशासन कार्यरत राहते :डॉ .बी .आर .कत्तुरवार

नांदेड: प्रतिनिधी
व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच त्याचा प्रशासनाच्या आरोग्य विभागाशी संबंध येतो गरोदर महिलेची आरोग्य विभाग तपासणी करते व एखादा अनोळखी इसम मृत्यू पावल्यास त्याचा अंत्यविधी ही प्रशासनच करते, म्हणजेच जन्माला येण्याच्या अगोदर पासून ते मृत्यू पश्चात प्रशासन हे व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असते .असे प्रतिपादन देगलूर महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. बी .आर .कत्तुरवार यांनी केले आहे .डॉ.कत्तुरवार यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील लोकप्रशासन विभागाद्वारे आयोजित केलेल्या सत्र आरंभ कार्यक्रमात बोलत होते. यशवंत महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.गणेश चंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा उप प्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी प्रमुख पाहुण्याचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलताना डॉ.कत्तुरवार यांनी अनेक मार्मिक किस्से सांगून प्रशासक हा कसा असावा, त्याच्या अंगी कोणते गुण असावेत आदर्श प्रशासक कोणाला म्हणावे ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या .आपले अध्यक्षीय समारोपात डॉ. कविता सोनकांबळे यांनी लोकप्रशासन आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ते एकमेकांच्या हातात हात घालून कार्य करीत असतात असे प्रतिपादन केले .लोकप्रशासनाच्या विभागप्रमुख डॉ.मिरा फड यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला व विभागाच्या ठळक घडामोडीवर प्रकाश टाकला .लेफ्टनंट डॉक्टर आर .पी .गावंडे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी यशवंत महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर भरत पारडीकर तसेच यशवंत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704