https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा कार्यारंभ

अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मार्गी लागला ))

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.
अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मिटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानवत शहरातील शासकीय विश्राम गृह ते महाराणा प्रताप चौक हा अडीच कि. मी. लांबीचा एकमेव मुख्य रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सूज्ञ नागरिकांमधून होत होती. कपडा मार्केट, भाजी मार्केट असून या सह महापुरुषांच्या जयंती मिरवणूक, गणेश मिरवणूक या मार्गाने होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर होत होता.नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन डॉ.अंकुश लाड यांनी तात्काळ पुढाकार घेत डांबरीकरणासाठी निधी मंजुर करून आणला. सर्व प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया पार पडून बुधवार, दि. 17 रोजी प्रत्यक्ष कामाचे उदघाटन करण्यात आले. हे काम कॅट आय या आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे धूळीची समस्या भेडसावणार नाही. या वेळी विजयकुमारजी कत्रुवार, जयकुमारजी काला, प्रकाश शेठ पोरवाल, श्रीकिशनजी सारडा, संजयजी लड्डा, अश्रोबा कुऱ्हाडे पाटील , ज्ञानेश्वर मोरे,सुरेश शेठ कडतन, बाबुराव हाळनोर, मुंजाभाऊ तरटे, डॉ योगेश तोडकरी, शिवाजी पाटील ,गणेश कुमावत ,राजकुमार खरात, विनोद रहाटे, किरण बारहाते, दत्ता चौधरी,मोहन लाड, बालाजी कुऱ्हाडे, शफिक भाई बागवान, नागनाथ कुऱ्हाडे, नगरा अभियंता सय्यद अन्वर बळीराम दहे, ओम भाऊ चव्हाण,पंकज लाहोटी,विजय कीर्तनकार, बाबा कच्छवे ,योगेश जाधव ,डॉ विष्णू काकडे, सूर्यकांत कडतन, आप्पा भिसे, विठ्ठलराव पवार ,संजय नाईक , सचिन मगर व व इतर् शहरातील नागरिक उपस्थित होते.

चौकट

मार्केट मधील पूर्ण रस्ता हा ६० मिटर असेल न.पा पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत राहील
आणी शासकीय विश्राम ग्रह ते महाराणा प्रताप चौक पर्यंत ३० मी असेल या रस्ताचे वैशिष्ट्य म्हणजे पाहण्यासारखे असेल

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704