एम सी आर
Uncategorized

पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सोमवार ,९ मार्च रोजी प्रदान केला जाणार.

पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सोमवार ,९ मार्च रोजी प्रदान केला जाणार.

नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै .सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय , परभणी आयोजित कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाचे कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृह जिंतूर रोड , परभणी येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांना सन्मान पूर्वक प्रदान केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर असणार आहेत.प्रसंगी आ.डॉ.राहुल पाटील (परभणी विधानसभा,परभणी ) आ.राजूभैय्या नवघरे (वसमत विधानसभा, हिंगोली) आ.राजेशदादा विटेकर (पाथरी विधानसभा ,परभणी ) थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे ( बैरागड, मेळघाट जिल्हा अमरावती ). डॉ.ज्ञानेश्वर डी.पवार ( प्र-कुलसचिव , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड.) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
माजी मंत्री स्व.रावसाहेब बापूसाहेब जामकर यांनी आपल्या सुविद्य‌‌‌ पत्नी सौ. कमलताई रावसाहेब जामकर यांच्या निधना नंतर कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार १९९७ पासून सुरू केला.
महिलांच्या स्वावलंबना सह सक्षमीकरणाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेचा सदरील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. पुरस्काराचे हे २३ वे वर्ष असून
पुरस्काराच्या मानकरी पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना सन- २०२५ यावर्षी चा २२ वा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या पूर्वी डॉ रेखा बैजल, डॉ वृषाली किन्हाळकर, डॉ .मेबल आरोळे , पद्मश्री सिंधुताई सपकाळ, डॉ. राणी बंग , डॉ. हेमलता पाटील , ॲड.सुरेखा दळवी , कु. नसिमा म.हुरजूक , सौ. वैशाली पाटील , सौ .प्रतिभा शिंदे ,
प्रा. साधना झाडबुके ,
पद्मश्री डॉ .मंदाताई आमटे , श्रीमती मायाताई सोरटे , श्रीमती रहेमत करीम बेग मिर्झा , श्रीमती सुमनसिंह चौहान व श्रीमती मिठू देवी , सौ. सुलोचना कडू , श्रीमती अनुराधा कोईराला, डॉ .ज्योत्स्ना कुकडे , श्रीमती पिंजारी बाई उल्ला पावरा, पद्मश्री राहीबाई सोमाजी पोपेरे , सौ.सुशीला विठ्ठलराव साबळे, श्रीमती योजना घरत यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोमवार ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय जिंतूर रोड ,परभणी येथे आयोजित कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी परभणी करांनी उपस्थित राहावे असे आवाहन दर्पण पुरस्कार समितीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर , उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब जामकर , सचिव विजयसिंह जामकर ,सहसचिव अनिल मोरे , सल्लागार समितीचे प्रा.किसन चोपडे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव , माजी प्राचार्य डॉ.वसंत भोसले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी व सर्व सदस्यांनी केले आहे.

Share

Related posts

धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Chief Editor

प्राचार्य बाबाराव नरवाडे, शंकर नरवाडे यांना मातृशोक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

Leave a Comment