स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयात शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा सुरळीत सुरू

———————————————–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्सट्रॅक्टर अँड स्टूडेंट जून 2025 इंग्रजी 30-40 परीक्षा दि.18/06/2025 ते 24/06/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदरील परीक्षा स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, संस्थेच्या प्रशासकिय अधिकारी ज्योती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. या परीक्षांसाठी फॉर्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड,केंद्र प्रमुख प्रा. राशेद दाईमी यांची निवड करण्यात आली. तर केंद्र परीक्षा नियंत्रक म्हणून एस. के. शेख काम पाहत आहेत.
सदरील परीक्षा ही सुरळीत पार पाडण्यासाठी आय टी समन्वयक म्हणून महेश हुलसुरे, प्रा. असिफ दाईमी हे कार्य करीत आहेत तर प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा.अनुजा चव्हाण, वैभव बिडवे, संदेश गवळे हे आय टी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत.