पणण महासंघाकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्याने पणण महासंघाच्या जिल्हा अधिकारी यांची खूर्ची केली जप्त.

Correspondent / Anil chavan
mcr.news/ manwat
———————————————
परभणी जिल्हा पणन अधिकारी यांची खुर्ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली जप्त सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने राज्य सरकारने पणन महासंघाच्या खरेदी केंद्रा मार्फत खरेदी सुरू केली. शेतकरी सोयाबीन घेऊन सरकारी काट्यावर गेल्यास कर्मचारी कपाळावर आठ्या घड्या पाडत मालाला नाव बोट ठेवत आहे तर कटी कपात करून शेतकऱ्याचा माल कसा बसा खरेदी करत आहेत. त्यात पणण महासंघाच्या केंद्रावर माल देऊन ही एक महिना झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत. एकीकडे बाजारात शेतकर्यांची लूट होत आहे म्हणुन शेतकरी सरकारच्या खरेदी केंद्राकडे वळत आहे परंतु तिथे हि शेतकऱ्यांना छळल्या जात आहे. सोयाबीन कापणी व काढणीचे पैसे शेतकऱ्यांना सोयाबीन विकुनच द्यावे लागतात. पण विकलेल्या सोयाबीनला एक एक महिना पैसे मिळत नाहीत म्हणुन अनेक शेतकरी सरकारी काट्यावर सोयाबीन देण्या ऐवजी कमी भावात व्यापाऱ्याला देतात.
या मुळे उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा भरून निघत नाही. शेतकर्यांच्या प्रश्नावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमचे सोयाबीन विकुन महिना उलटला तरी शासनाकडून आमचे पैसे आजून ही मिळाले नाही. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हा पणण महासंघाच्या कार्यालयात गेले असता तिथे मूख्य कर्मचारी अधिकारी उपस्थित नव्हते आणि जे कर्मचारी उपस्थित होते ते उडवा उडवीचे उत्तर देत होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करत ती खूर्ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परभणी जिल्हा कार्यालयात आणुन ठेवली जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे मिळतील तेव्हा ही खुर्ची परत करू असे काहीचे म्हणणे आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, मुंजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, उध्दव जवंजाळ आदीपदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
***