यशवंत ‘ मधील कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

नांदेड:( दि.२५ मार्च २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स एसयुओ श्रीनाथ धनजे आणि जेयुओ शंकर वहिंदे यांची जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झालेली आहे.
या निवडीबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी दोन्ही कॅडेट्सचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर आणि प्रा.प्रियंका सिसोदिया यांची उपस्थिती होती.
जम्मू आणि काश्मीर येथील राष्ट्रीय शिबिराचा कालावधी १७ मे ते २७ मे आहे. या ट्रेकिंग कॅम्पचा उद्देश कॅडेट्समध्ये आत्मविश्वास जागृत करणे आणि त्यांना विविध वातावरणातील आव्हानांशी मुकाबला देण्यासाठी तयार करणे, हा आहे. एनसीसी ट्रेकिंगमध्ये पॅरासेलिंग, पर्वत चढणे, वेगवेगळ्या प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन करते.
या निवडीबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, सहसमन्वयक डॉ.साहेब शिंदे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील,जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन केले आहे.