सर्व प्रश्नांवर उपाय म्हणजे योग व ध्यान -प्रा.रुद्रावती चव्हाण

*
नांदेड :(दि.२८ जुलै २०२५)
योग म्हणजे स्वतःचा शोध व स्वतःवर प्रेम करणे होय. योग हे विज्ञान असून चार हजार वर्षांपूर्वी योगसूत्र या रूपाने त्याचा उगम झाला. मानवी मानसशास्त्राचा अभ्यास योगामध्ये होतो. सर्व प्रश्न व रोगांवर एकमात्र उपाय म्हणजे योग व ध्यान होय, असे प्रतिपादन योगतज्ञ प्रा.रुद्रावती चव्हाण यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला सुरक्षा व सुधार समिती आणि प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘ योग आणि ध्यानाद्वारे आरोग्य संपन्नता’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी, योग आणि ध्यानाद्वारे जीवनातील भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होतो. जीवन असेल तरच बाकी इतर क्षेत्राला अर्थ आहे. योग व ध्यान जीवनासाठी आहे, असे विचार मांडले.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय नंनवरे यांनी, मनावरील ताणतणाव, चिंता, नैराश्य या समस्यांवरील उपाय म्हणजे योगधारणा होय. शिस्तबद्ध जीवनशैली त्यामधून प्राप्त होते, असे सांगितले.
या विषयावर समायोचित विचार मांडताना राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी, ध्यानधारणेतून करुणेची निर्मिती होते. मन हे संवेदनशील बनते. इतरांची कोणतीही हानी होऊ नये, ही बाब निसर्गतः मनात ठेसते. ध्यान हे उत्कृष्ट जीवनशैलीचा शेवटचा टप्पा आहे, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सुरक्षा व सुधार समिती समन्वयिका डॉ.मंगल कदम यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.धनराज भुरे यांनी करून दिला तर शेवटी आभार डॉ. नीताराणी जयस्वाल यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ.मीरा फड, डॉ.रत्नमाला म्हस्के, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.कैलास इंगोले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ.अंजली जाधव, डॉ.अर्चना गिरडे, डॉ. नीताराणी जयस्वाल, डॉ.एस.एस. वाकोडे, प्रा.राजश्री भोपाळे यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..