सायन्स कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे यांचा मान्यवरांकडून सत्कार आणि शुभेच्छा

नांदेड:( दि.८ ऑगस्ट २०२५)
नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ.लक्ष्मण शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे.
या नियुक्तीबद्दल यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख आणि स्वामुक्टाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गौतम दुथडे, यशवंत महाविद्यालयातील गणित विभागाचे माजी विभागप्रमुख तथा पीएचडी मार्गदर्शक डॉ. वनदेव बोरकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ. वीरभद्र स्वामी, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमतचे प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव, औंढानागनाथ येथील नागनाथ महाविद्यालय, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.दत्ता कुंचेलवाड, लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.डी.शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गंगाधर सोनकांबळे आदींनी प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे यांचा शॉल, पुष्पहार आणि मिठाई भरवून सत्कार केला, तसेच त्यांच्या भावी प्रशासकीय व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्याकरिता सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.