स्वारातीम विद्यापीठांसमोर महिला प्राध्यापिकेचे आमरण उपोषण

नांदेड: संस्थेच्या सुडबुद्धीच्या राजकारण्याने एका महिला वरिष्ठ प्राध्यापिकेची सेवा समाप्त केली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात सदर महिला प्राध्यापिकेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर मागील दोन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे.
सदरील उपोषणकर्त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुदखेड येथील वाणिज्य विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ.जानका संग्राम पांडुर्णे ह्या मागील 21 वर्षापासून या महाविद्यालयात कार्यरत होत्या. परंतु या संस्थेतील संचालक मंडळाने सोड बुद्धीचे राजकारण करून सदरील प्राध्यापकाची नियुक्ती नियम बाहेर आहे असे सांगत नियुक्ती रद्द करून सेवा समाप्त केली आहे. विशेष म्हणजे याच संस्थेने सदरील महिला पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली होती. संस्थेच्या संचालकांनी ही नियुक्ती शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसल्याची कारण सांगून सेवा समाप्त केली असल्याची उपोषणकर्त्या म्हणणे आहे. याबाबत सदर महिलेने न्यायालयात दात मागितली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना विद्यापीठ प्रशासनानेही या पदाची मान्यता रद्द केली आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्यांनी नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार नसतानाही डॉ. जानका पांडुर्णी यांची सेवा समाप्त केली आहे. विशेष म्हणजे डॉ. जानका पांडुर्णी यांची ज्यावेळी नियुक्ती केली . त्या काळातच महाविद्यालयातील पाच प्राध्यापकांना नियुक्ती देण्यात आली. परंतु या पाच प्राध्यापकांना संस्थेने आपल्या बाजूने ठेवून त्यांची नियुक्ती आणि सेवा समाप्त का केली नाही असा सवालही त्यांनी केला आहे.
संस्थाचालकाच्या सूडबुद्धीच्या राजकारणातून माझी सेवा समाप्त केली असून विद्यापीठ प्रशासनाने मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.