देगाव कु येथे आषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगांव: अर्धापूर तालुक्यातील देगाव कु येथे आषाढी एकादशी निमित्त स्वराज्य मित्र मंडळ आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन लढे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात जवळपास ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, काँग्रेसचे युवा नेते पप्पू पाटील कोंडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दशरथ कदम अमित भैया दांडेगावकर, अर्जुन गाडे, सरपंच प्रतिनिधी बालाजी फुलारी,माजी उपसरपंच रामकृष्ण कदम,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू कदम, तुकाराम कदम, विश्वनाथ कदम, माधव कदम, विनोद कदम, विकास शेटे, प्रदीप लढे, मारुती कदम, केदारनाथ कदम, ओम कदम, पांडुरंग लढे, गणेश कदम, कृष्णा कदम, आकाश कदम आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.