खरबा येथे माॅसाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
————————————————
मानवत तालूक्यातील मौजे खरबा जिल्हा प्ररिषद शाळे मध्ये राष्ट्रमाता, राजमाता, माॅसाहेब, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरबा ग्राम पंचायतीच्या महिला सदस्या सौ, अनिता हरिभाऊ निर्मळ व उपाध्यक्ष नामदेव निर्मळ (देवा) खरबा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनूमान रनेर, पोलिस पाटील सिध्दार्थ सुरवसे व सौ राधा रनेर , मिना वाघमारे , अंगणवाडी शिक्षिका अनिता ढगे, व सेविका लिंबाबाई शिंदे , प्रकाश निर्मळ, कांचन ढगे, यांच्यासह खरबा ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी अनेक शालेय लहान मुलांनी वेशभूषा करून आपली कला सादर केली, या वेळी हनुमान रनेर यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले तर खरबा जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
**