https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला : “नवे वर्ष नवी उमेद’: लैलेशा भुरे

*नवे वर्ष नवी उमेद*
**************************
२०२३ वर्ष बघता बघता कसे निघून गेले ते कळलेच नाही.नववर्षाच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व लोक नवे वर्ष साजरे करण्यासाठी जागे असतात.सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाची नवी पहाट उगवते.गत वर्षाच्या खूप कडू-गोड आठवणी असतात.सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केल्या जातं.लोक अगदी एखाद्या सणाप्रमाणे हा नववर्षाचा सोहळा साजरा करतात.


खरंतर आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या कायमस्वरूपी नसतात.दिवसामागून दिवस सरतात.दिवस उजाडतो , दिवसांनंतर रात्र येते असा क्रम नित्यनेमाने चालू असतो.प्रत्येकच दिवस काहीतरी अनुभव देऊन जातो.कॅलेंडरची पाने बदलतात आणि नवे वर्ष कधी येते कळतही नाही.सरत्या वर्षात काही ऋणानुबंध भरभरून प्रेम देतात,तर काही नाती मनात रुसवा-फुगवा मनात धरून असतात.शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं.त्यामुळे अशा लोकांमुळे वाईट वाटून न घेता आपण नवीन वर्षात सर्वांशीच चांगले वागायचे.कॅलेंडर बदलले तरी जीवनक्रम तोच असतो.कळत नकळत आपली आठवण कुणीतरी काढावी एवढे नीटनेटके आपले वागणे असले तरी बस्स! लोक आपल्याशी नीट वागले नाही तरी आपण त्याचा जास्त विचार न करता आपले विचार सुंदर आणि सुपीकच ठेवायचे.
नवीन वर्ष म्हणजे नवनव्या संकल्पनांचा मुहूर्ताचा क्षण.नववर्षाचा नवा दिवस आपल्या मनात एक नवी उमेद जागवतो.या नव्या दिवशी उगवणारा सूर्य तोच असला तरी एक आशेची किरण सोबत घेऊन येतो.२०२३ ला टाटा करायचा.२०२४ मध्ये नातेसंबंध अधिक दृढ करायचे.मनसोक्त हसायचे, माणसे जोडत जायची,माणुसकीला जपायचं आणि आयुष्य आनंदी करायचं.आयुष्य असच असतं.जुनं मागे सोडून नव्याचा स्विकार करायचा असतो.चला…उद्याची नवी पहाट अनुभवायला सज्ज होऊया.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704