https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ञाचे ऑनलाईन व्याख्यान संपन्न

नांदेड:(दि.१७ सप्टेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, यू.के. येथील डॉ.प्रणाली पाटील यांचे ‘विज्ञान संवादाचे महत्त्व आणि व्याप्ती’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान दि.१५ सप्टेंबर रोजी संपन्न झाले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वेबेक्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.महेश कळंबकर होते.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.महेश कळंबकर यांनी रसायनशास्त्र विभाग व यशवंत महाविद्यालयात चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ.मदन अंभोरे यांनी डॉ.प्रणाली पाटील यांचा परिचय करून दिला.
डॉ.प्रणाली पाटील यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये, विज्ञानाचे महत्त्व व विज्ञान विषयातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील वाढलेली व्याप्ती तसेच विज्ञान विषयातील वेगवेगळ्या संधी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण व सविस्तर असे प्रेरणादायी व्याख्यान दिले तसेच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये असणाऱ्या सुविधा व राबवले जाणारे उपक्रम याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतातील विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात असणाऱ्या संधी विषयी त्यांनी विस्ताराने भाष्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अंभोरे यांनी केले,तर आभार डॉ. संभाजी वर्ताळे यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ. योगेश नकाते, डॉ.राठोड, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एम.ए.बशीर, डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.विजय भोसले, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.कविता केंद्रे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.निलेश चव्हाण,डॉ.अनिल कूवर, प्रा. संतोष राऊत, प्रा.शांतूलाल मावस्कर, डॉ. स्नेहल पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जवळपास ८० विदयार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704