https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

युवकांनी जिवनातील समस्यांचा बाऊ करू नका* *@)> पोलिस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा.

मानवत / प्रतिनिधी.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक समस्या असतात. ज्यांना यशस्वी व्हायचे आहे त्यांनी समस्यांचा बाऊ न करता आत्मविश्वासाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले.

येथील साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने रविवार, दि. 20 रोजी आयोजित स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ.अशोक चिंदूरवार हे होते तर व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष संजय लड्डा, ऍड. रोहित पाटील यांची उपस्थिती होती.
पूढे बोलताना गिल्डा यांनी सांगितले की, कुठल्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, सराव आणि सातत्य आवश्यक असते. विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाचा अभाव, साधनांची कमतरता व कौटुंबिक पार्श्वभूमी या प्रकारच्या समस्या अडथळा ठरु शकतात. मात्र यशस्वी व्हायचे असेल तर या समस्यांचा जास्त विचार करून त्यांना मोठे करू नये. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवले. ज्या क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला त्यात सर्वोत्तम कामगिरी करावी.
कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मोहनराव बारहाते यांनी केले. सूत्रसंचालन विलास मिटकरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे सचिव रेणकोजी दहे, अशोक देशमाने, शैलेश काबरा, सुभाष बंडे, कहेकर यांनी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704