ग्रामीण लक्ष्मीचे कूंकू रस्त्याच्या कडेला आडवे.

L
मानवत / प्रतिनिधी.
राज्य शासनाला सर्वात जास्त महसूल मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागात देशीसह गावटीचा महापूर वाहू लागल्याने अनेक संसार दररोज देशोधडीला लागत आहेत. महसूलच्या नावावर सरकारची तिजोरी ओसूंडून भरभरून वाहत आहे. पण यामूळे ग्रामीण महिलांच्या कूंकवाचा धनी घराकडे न जाता शहरातील रस्त्याच्या कडेवरच आडवे होतांना दिसत असल्यामूळे पादचारी हळहळ व्यक्त करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारने महसूलात होणारी तूट भरून काढण्यासाठी अबकारी कर म्हणून महसूल वाढ करण्यासाठी मागेल त्याला देशी विदेशीचा व गावठी चा खूला परवाना दिला की काय ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
शहरासह गावठी राजरोस पणे ग्रामीण भागासह शहरात उपलब्ध होत असल्याने तळीरामांच्या संख्येत दिवसोनदिवस वाढ होत आहे. करोना काळात दवा पेक्षा दारू महत्वाची असल्याचा दिव्य साक्षात्कार जनतेला आला. पोलिस बंदोबस्तात दारू घ्यावी लागली त्यामुळे सर्वांना देशी व विदेशी हि सहज उपलब्ध झाली. तर आज शहरासह ग्रामीण भागातून महापूर वाहतांना दिसत आहे.
ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येणारे नागरिक हे तळीरामाच्या भूमिकेत रस्त्याच्याकडेला आडवे झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्यामूळे चिंता व्यक्त केल्या जात आहे.
.