स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त नेरली शाखा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त नेरली शाखा येथे भव्य रक्तदान शिबिर
नांदेड, : १८ जून, २०२५ स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नेरली येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिराला बँक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारात सकाळी १० वाजता सुरू झालेले हे शिबिर सांयकाळी ३ वाजेपर्यंत सुरू होते. या प्रसंगी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण गरुड यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “स्टेट बँक ऑफ इंडिया केवळ बँकिंग सेवा पुरवत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्यासही कटिबद्ध आहे. ७० वर्धापन दिनानिमित्त आयोजित हे रक्तदान शिबिर समाजासाठी काहीतरी परतफेड करण्याच्या आमच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. असे ते बोलताना म्हणाले”
या शिबिरासाठी नंदिग्राम ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले . यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका व्यक्तीने केलेले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते, असा संदेश या शिबिरातून देण्यात आला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बँक कर्मचारी स्वाती कंदेवार, रूपाली सूर्यतळे धनश्री ढोले . तसेच मदतनीस कमलाकर नवाडे, शिवकांत रत्नपारखी स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.