नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आषाढी एकादशी निमित्त “निर्भया वारी” चे आयोजन करण्यात आले होते..

नांदेड:
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून सामाजिक बांधिलकी म्हणून मिशन सहयोग अंतर्गत 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत. त्यापैकी “मिशन निर्भया” मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बँड टच, बाबत माहीती, अंमलो पदार्थाचे दुष्परिणाम, नैतिकता ई. तसेच “मिशन समाधान” या मध्ये महिलांच्या व विद्यार्थिनीच्या सुरक्षितसेसाठी “QR” कोड आधारित तक्रार नोंदणी सुविधा, याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. अंतिम टप्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ, Subject/Faculty Expert यांचे पॅनल डिस्कशन असणार आहे.
दिनांक 04.07.2025 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून चालू असलेले “मिशन निर्भया” व “मिशन समाधान” अंतर्गत शालेय विदयार्थी व बालकांकरीता निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमा अंतर्गत श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांचा मानस होता की, शालेय विद्याथों व बालक यांना त्यांच्या शाळा, शिकवणी वर्ग याच्या व्यस्ततेमुळे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कर्तव्यामुळे ब-याच वेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये सहभाग नोंदविता येत नाही. तसेच सदर निर्भया वारीव्दारे बालक, पालक व समाजामध्ये वर नमुद विविध विषयाबाबत जनजागृती व्हावी म्हणून निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर निर्भया वारीस महात्मा फुले पुतळा आय.टि. आय. चौक येथून मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यामध्ये शहरातील विविध शाळा महात्मा फुले, विजयनगर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबानगर, गुजराती हायस्कूल, गुरूकुल, चैतन्या ई-टेक्नो स्कुल, केंद्रीय विदयालय, स्टुडंट पोलीस कॅडेट, 52 बटालियनचे NCC कैडेटस, श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था असे जवळपास 1500 विदयार्थानी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी पेहराव करून, टाळ-मृदंग, चिपळ्या, भजन किर्तनाचा जयघोष करत मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये चिमुकली विठ्ठल-रुक्मिणी व लहान वारकरी विशेष आकर्षण ठरले होते. तसेच मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड व श्रीमती डॉ अश्वीनी जगताप यांनी विदयार्थामध्ये वारकरी फुगडीचा फेर धरला तसेच टाळ वाजवून साद दिली. पोलीस मुख्यालय येथील नवप्रशिक्षीत पोलीस व दंगल नियत्रंण पथक यांनी देखील टाळ वाजवून सहभाग नोंदविला.
सदरची वारी ही महात्मा फुले पुतळा आय.टि.आय.चौक ते कुसुम सभागृह व्हि.आय.पी. रोड मार्गे परत आय.टि. आय. चौक या ठिकाणी आली व मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यानंतर आय.टि. आय. मैदानात वारीमधील विदयार्थाना संबोधीत केले तसेच त्यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या “ऑनलाईन कम्प्लेंट रिडेसल सिस्टम” चा व QR आधारीत तक्रारीचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात आले. वारीचे कार्यक्रमांती अल्पोहार म्हणून फळे, बिस्कीट व पाणी बॉटल्स वाटप करण्यात आल्या. निर्भया वारीची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली. विदयार्थाना नेण्या आनण्याची व्यवस्था पोलीस दलामार्फत करण्यात आली होती.
सदर वारीमध्ये अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड व श्रीमती डॉ अश्वीनी जगताप, रापोनि विजय धोंडगे, मपोनि चोपडे, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, जयप्रकाश गुट्टे, कराळे, पुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटिल, जगताप, पोलीस उपनिरीक्षक चव्हान, दर्शने, पिपरखेडे, गिरे, सय्यद व इतर अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला सदर वारीचे सुत्रसंचालन प्राध्यापक संतोष देवराय, यांनी केले व वाहतूक नियोजन पोलिस निरीक्षक साहेबराव गुट्टे शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड यांनी पाहिले.