ताज्या घडामोडी

स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. अशोक महाजन रुजू

नांदेड (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. अशोक महाजन हे दि. ३ मार्च रोजी रुजू झाले आहेत. डॉ. महाजन हे विद्यापीठाचे पाचवे प्र-कुलगुरू म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी डॉ. एस.एस. ऊके, डॉ. जे.एन. शिंदे, डॉ. जे.एन. बिसेन आणि डॉ. माधुरी देशपांडे (प्रभारी) यांनी या पदावरील कामे पाहिले आहेत.
डॉ. महाजन यांना अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन यामधील कामाचा ३७ वर्षापेक्षाही अधिक अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक विषयांमध्ये डॉक्टरेट असणारे डॉ. महाजन यांनी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २२ वर्षे अध्यापन केलेले आहे. त्यापैकी पाच वर्षे विद्यापीठ प्रशासनातील प्रमुख अशा ‘कुलसचिव’ पदावर त्यांनी काम केले आहे. त्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयांमध्ये जवळपास १५ वर्षे त्यांनी अध्यापन व संशोधन केले आहे. जगभरातील जवळपास २९ देशांना त्यांनी शैक्षणिक कमानिमित्त भेटी दिल्या आहेत.
डॉ. महाजन यांनी आजपर्यंत भारतीय अनुदान संस्थामार्फत एकूण १० संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामधून जवळपास ३ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १० विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी पूर्ण केली आहे. सध्या चार विद्यार्थी पीएचडी करत आहेत. त्यांचे संशोधनातील कार्य हे उल्लेखनीय असून त्यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद तसेच नियतकालिकांमध्ये २२८ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांच्या नावावर एक पेटंट आहे. त्यांनी मटेरिअल व डिव्हाईस लॅबोरेटरी फॉर नॅनोइलेक्टोनिक्स (MDLN) ही संशोधन प्रयोगशाळा उभारून त्यात MOS डिव्हाईस निर्मिती साठी ‘क्लास १०००० क्लीन रूम’ ही अद्ययावत प्रणाली विकसित केली आहे. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव येथे कुलसचिव म्हणून पाच वर्षे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून त्यादरम्यान त्यांनी सिनेट, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, बांधकाम समिती, इ. च्या सचिव म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे.
असा प्रदीर्घ शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय अनुभव असणारे डॉ. महाजन यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या शिवाय विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. अधिसभा सदस्य, मा. विद्यापारीषद सदस्य, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.