यशवंत ‘ मध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नांदेड:(दि.२३ जुलै २०२५)
यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जलक्रांतीचे प्रणेते आधुनिक भगीरथ भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. २३ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे होते. प्रमुख उपस्थिती डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील डॉ. स्नेहा भानुशाली (बीटीओ) व डॉ. सतीश गोरे (बीटीओ) यांची होती तसेच कुणाल महागडे, नवनाथ कापसे, प्रकाश सुरनर, दीपक शिंदे, शेख अब्दुल, शामराव जोंधळे, सय्यद बशीर आदी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी मार्गदर्शन करतांना, रक्तदान हे सर्वदानामध्ये श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे गरजूना जीवदान मिळते, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी, पैसा हा साठवून ठेवला की तो दुप्पट होतो; परंतु रक्त हे साठवून ठेवल्यानंतर दुप्पट होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना व सहकाऱ्यांना केले.
या रक्तदान शिबिरात प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.अर्जुन गुरखुदे, प्रा.संकेत देलमाडे, डॉ.संतोष पाटील, प्रा.शांतूलाल मावस्कर, परशुराम जाधव यांच्यासह एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजनंदीनी देशमुख हिने केले तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले यांनी तर आभार डॉ.राजरत्न सोनटक्के यांनी मानले .
कार्यक्रमास प्रा. श्रीराम हुलसुरे, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.कांचन गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के व प्रा. राजश्री भोपाळे, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे तसेच स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आणि डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.


