यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय कार्यालय नांदेड या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी .

नांदेड :प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय कार्यालय नांदेड या ठिकाणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली .
या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागीय कार्यालयाची वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार तथा विभागीय संचालक प्रोफेसर डॉक्टर यशवंत कल्लेपवार हे होते तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सुमन माधव महिला विद्यालयाचे प्राचार्य प्रा .डॉ . दिग्विजय देशमुख तसेच राजीव गांधी ( BCS & BCA ) महाविद्यालय चे प्राचार्य प्रो. डॉ . जाधव हे होते .
अध्यक्षीय स्थानात बोलत असताना विभागीय संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आढावा दिला . छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली म्हणूनच आज सार्वजनिक स्तरावर व घराघरात प्रत्येक व्यक्ती अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात असे सांगितले .
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमास प्रा .गजानन इंगोले सर , प्रा . सचिन खडके , प्रा . सुरेश तिवारी , सौ . मनिषा तिवारी मॅडम तसेच विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यात प्रामुख्याने दिलीप थोरात सर , डॉ . अविनाश कोलते सर , विकास पावडे ,नितेश देशमाने ,मिलिंद जोगदंड , नागनाथ टोणगे , माधव गिरे , माधव वैद्य , अक्षय गिरे , गजानन कोकाटे , श्रीमती लुट्टे , मुंजाजी कदम आणि आईनस्टाईन मुंडे इ . सर्व उपस्थित होते .
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कु .श्राव्य देशमुख या लहान चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विविध चारोळ्यांचे वाचन केले .