अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -ना.ललित गांधी

नांदेड/प्रतिनिधी
अल्पसंख्यांक विकासासाठी राज्य सरकारने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक महामंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ना. ललित गांधी यांनी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असे आश्वासन सकल जैन समाज संघाच्यावतीने नियोजन भवन येथे आयोजित जैन सन्मान सोहळा 2025 येथे केले.
जैन समाज काही ठिकाणी श्रीमंत तर काही ठिकाणी अत्यंत गरीब आहे. आपल्या परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून त्याच्या प्रथम अध्यक्षपदी ना. ललित गांधी राज्यमंत्री दर्जा यांची नियुक्ती केली आहे. सकल जैन समाज संघ नांदेडच्यावतीने त्यांचा नियुक्तीबद्दल जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते समाज बांधवांशी संवाद साधत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड भूषण डॉ.बाळासाहेब साजणे व उद्योगपती फुलचंदजी जैन (रवि मसाले) आणि नांदेड येेथील सर्व मंदिरांचे अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी सकल जैन समाज सेवासंघाच्यावतीने डॉ. सौरभ जोगी, डॉ. रूपाली जैन, सुनिता सांगोले यांचा विशेष सन्मान तर श्रीकांत काळे परभणी, विजय चोरडिया, मनिष जैन छत्रपती संभाजीनगर, अॅड. कांचनमाला संगवे धाराशिव, प्रकाशचंद सोनी हिंगोली, जयप्रकाश दगडे ज्येष्ठ पत्रकार, मिलिंद एंबल, सामाजिक कार्यकर्ते हर्षदभाई शाह, भारतीय वनसेवेतील अधिकारी यश काळे, तर हास्थीमल बंब आणि माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांना जैनरत्न सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन सकल जैन समाजातील समाजोपयोगी कामांचा गौरव करून सन्मानप्राप्त व्यक्तीप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणे हा आयोजनाचा मागचा उद्देश असल्याचे सचिव ऋषीकेश कोंडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सकल जैन समाजातील 500 पेक्षा अधिक बंधू-भगिनी उपस्थित होते. सुत्रसंचलन ऋषीकेश कोंडेकर यांनी तर आभार रोहन कोंडेकर यांनी मानले. सकल जैन समाज एकीकरणासाठी चालविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


