लवकरच श्री,लक्ष्मी- नृसिंहच्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर दोनशे रूपये प्रमाणे रक्कम जमा होणार.> जिल्हाध्यक्ष >किशोर ढगे.

मानवत / प्रतिनिधी.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या मार्गदर्शनाखाले आज श्री.लक्ष्मी नृसिंह सहकारी साखर कारखान्याचे MD श्री. शेजुळ यांची भेट घेऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांची मागील हंगामातील २००/- रू. आज पर्यंत बाकी राहिली असून ती रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी अन्यथा यंदा चालू हंगामात कारखाना सुरू करू देणार नाही असा ईशारा या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर ढगे दिला.
या वेळी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी कारखान्याचे मॅनेजमेंट डायरेक्टर ( M.D. ) शेजुळ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करतांना सांगितले कारखान्याच्या मॅनेजमेंटला बोलुन लवकरात लवकर आपली मागणी मान्य करून ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करायला लाऊ त्यामूळे पून्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.
अशी ग्वाही कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर ( M.D. ) शेजूळ यांनी या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळास दिली.
***