परभणी जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची फेरनिवड झाल्याबद्दल ताडकळस येथे भव्य सत्कार..

Correspondent / Anil chavan
mcr.news / manawat
————————————————
ताडकळस येथे दिनांक २९ डिसेंबर रोजी पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने प्रसाद पौळ यांची परभणी जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा दिनांक २९ डिसेंबर वार रविवार रोजी सत्कार शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सल्लागार शिवाजीराव शिराळे पाटील ,
दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते, सहसचिव बाळासाहेब राऊत, पत्रकार जनार्धन आवरगंड, ज्येष्ठ नागरिक नारायणराव काळे पाटील , नाभिक समाजाचे नेते गैयबी भालेराव , दतराव पवार, सूर्यवंशी यांच्या सह आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जनार्दन आवरगंड यांनी केले. तर सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन शिवाजीराव शिरोळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताडकळस पत्रकार संघाने परिश्रम घेतले.
***