ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसा

———————————-
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या संस्थेच्या 26 व्या वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थित प्रेक्षकांनी दिला.
प्रारंभी सकाळी 11 : 00 वाजता संस्थेच्या 26 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विश्वंभरराव जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठलराव जाधव पाटील व विशेष उपस्थिती म्हणून रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल उदगीरचे प्राचार्य व दै.लोकमतचे वार्ताहर श्रीपाद सिमंतकर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, प्राचार्य संजय हट्टे, प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, प्राचार्या ज्योती तारे, प्राचार्य नागेसन तारे, प्राचार्या मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, उपप्राचार्य सतिश वाघमारे, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे,पत्रकारिता
विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, प्रा. राशिद दायमी यांची उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, कोणत्याही संस्थेचा विकास हा त्या संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाप्रती असलेल्या निष्टेवर अवलंबून असतो. ही संस्था अतिशय कष्टाने व मेहनतीने आज ताठ मानेने उभी आहे ती केवळ आपल्या दर्जेदार शिक्षणामुळे. संस्थेने सर्वात प्रथम उदगीर शहरात सीबीएससी बोर्डाची शाळा उभारून नावीन्यपूर्ण व दर्जेदार शिक्षणाला सुरूवात केली. आज घडीला संस्थेच्या संकुलात यूजी टू पीजी व पीएच.डी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पूर्वी व्यावसायिक शिक्षण घ्यायचे म्हणले तर नांदेड, लातूर, पुणे, औरंगाबाद याठिकाणी जावे लागत. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता संस्थेने सर्व व्यावसायिक शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध करून दिले ज्याचा फायदा उदगीर व आसपास च्या ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांना झाला. येणाऱ्या काळात संस्था येथील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण कसं देता येईल या दृष्टीने पाऊले टाकीत आहे. तर संस्थेतील प्रत्येक शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांच्या शैक्षणीक व आर्थिक विकासा साठी देखील प्रयत्नशील असेल असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती स्वामी यांनी तर सूत्रसंचालन मनोरमा शास्त्री, स्नेहा लांडगे व आभार सतीश वाघमारे यांनी मानले.
या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तेर कर्मचारी साठी संगीत रजनी हा हिंदी- मराठी गीता आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संगीत मय कार्यक्रमात जुने नवे हिंदी मराठी गीत सादर करण्यात आली. तसेच एका पेक्षा एक सरस अशा लावणी नृत्य सादर करीत उपस्थित प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली
हा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश हुलसुरे, विठ्ठल कारंजे, सादीक शेख, अमोल भाटकुळे, वैभव बिडवे, संदेश गवळे, सुशांत जाधव, पाटील सर, पवळे सुरेश, नरसिंग जानके, तुकाराम मुंडे यांच्या सह सर्व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.