ताज्या घडामोडी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अतुलनीय योगदान*- प्रा.डॉ. दत्तहरी होनराव

नेसुबो महाविद्यालयात वार्षिक महोत्सव साजरा

नांदेड (प्रतिनिधी): भारतीय मातृभूमीला इंग्रजाच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्या काळी स्वतःला मिळालेल्या भारतीय नागरी सेवेच्या पदाचा त्याग करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदान दिल्याचे प्रतिपादन *प्रा. डॉ. दत्तहरी होनराव* यांनी केले.
अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि वार्षिक महोत्सव या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष *मा. बालासाहेब पांडे,* तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित *आमदार ॲड.श्रीजयाताई चव्हाण,* अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सचिवा *ॲड. वनिता जोशी* , *कोषाध्यक्ष कैलासचंद काला,* *सहसचिव श्री. धनंजय जोशी, सदस्य श्री. गजानन कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ. अर्चना भवानकर, एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख प्रा. कमलाकर बाऱ्हाळीकर, वार्षिक विद्यार्थी महोत्सव प्रभारी प्रा. डॉ .जीवन मसुरे, माजी प्राचार्य प्रा. डॉ. सुधीर शिवणीकर* यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत हे स्वागतपर गीत सादर करून महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. जिगिषा देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख *प्रा.
डॉ. मिनाक्षी बांगर* लिखित वनस्पतीशास्त्र विषयाच्या दोन संदर्भ ग्रंथांचे आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख *प्रा. डॉ. मनीष देशपांडे* यांच्याद्वारे लिखित दोन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन हे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय .कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सांगत महाविद्यालयातील सर्व विभागांचे असणारे योगदान यावर प्रकाश टाकला.
यावेळी भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित *आमदार ऍड.श्रीजयाताई चव्हाण* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की ,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करत देशभक्ती आणि देश प्रेम अंगीकारले पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे गेले पाहिजे असे त्या बोलताना म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अभिनव भारत शिक्षण संस्थेचे *अध्यक्ष बालासाहेब पांडे* म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेताजी यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज व देश हितासाठी कार्य करावे. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या संपर्कात राहून आपल्या ज्ञानात वाढ कशा पद्धतीने करता येऊ शकेल यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनीष देशपांडे यांनी तर आभार प्रा. डॉ.संतोष कोटुरवार यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या प्रसंगी माजी प्राध्यापक डॉ दीपक कासराळीकर, प्रा. अजय संगेवार, प्रा.गिरगावकर तसेच मोठया संख्येने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.