ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

नांदेड: प्रतिनिधी

श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदव्युत्तर इंग्रजी विभाग व संशोधन केंद्राद्वारे ३ व ४ फेब्रुवारी रोजी ‘आधुनिक प्रवृत्ती: इंग्रजी भाषा व साहित्य शिक्षण’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद (MTELLT) आयोजित करण्यात आली होती. पीएम:उषा: टू स्ट्रेंथन कॉलेजेस या योजनेअंतर्गत या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते.
उद्घाटनसत्राचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारणी सदस्य मा. नरेंद्र चव्हाण होते तर संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर उद्घाटक होते. याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य व परिषदेचे निमंत्रक डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन.मोरे, इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रोहिदास नितोंडे, इंग्रजी विभागप्रमुख व संघटक सचिव डॉ.एल. व्ही.पद्माराणी राव आणि समन्वयक डॉ. अजय टेंगसे उपस्थित होते.
उद्घाटकीय संबोधनामध्ये डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी परिषदेचे उद्घाटन करून परिषदेला शुभेच्छा दिल्या. वेगवेगळ्या शिक्षणपद्धतीचे महत्त्व सांगितले. आधुनिक शिक्षणामध्ये आधुनिक पद्धतीचा कसा उपयोग करण्यात आलेला आहे, यांची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदा प्राध्यापक आणि संशोधकांना कशाप्रकारे उपयोगी ठरतात, याविषयी माहिती सांगितली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
अध्यक्षीय समारोपात मा.नरेंद्र चव्हाण यांनी, भाषेचे महत्त्व आणि अध्ययन पद्धती याविषयी माहिती दिली.
डॉ. अजय टेंगसे यांनी परिषदेची प्रस्तावना केली तर डॉ.एल.व्ही. पद्माराणी राव यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले.
परिषदेतील प्रमुख वक्त्यामध्ये डॉ. हेमा रामनाथन (यूनिवर्सिटी ऑफ वेस्ट जॉर्जिया, यूएसए) यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी विविध पद्धती वापर कशाप्रकारे केला जातो, याविषयी सविस्तर माहिती सांगितली. करियर घडविण्यासाठी कौशल्याचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही, यावर भर दिला.
डॉ.रोहन अबेविक्रमा (सबरगामुवा युनिव्हर्सिटी, श्रीलंका) यांनी, उत्प्रेरक म्हणून शिक्षकाची भूमिका आणि गुणवत्ता किती महत्त्वाची आहे, याविषयी आपल्या मनोगतात सांगितले.
डॉ. खूंम शर्मा (पद्म कन्या कॅम्पस, नेपाळ) यांनी, भाषा संपादनामध्ये साहित्य कसे उपयोगाचे आहे, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषांचे उदाहरण देऊन त्यांनी भाषेचे महत्त्व व संस्कृतीची भिन्नता स्पष्ट केली.
डॉ. रवीनारायण चक्रकोडी, (रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, साउथ इंडिया, बेंगलूरु) यांनी, बहुभाषिक अध्यापन शास्त्राची तत्वे आणि धोरणे यांचे महत्त्व सांगितले. बहुभाषिक अध्यापनशास्त्राचा अध्यापकाला कशाप्रकारे उपयोग होतो, याचेही त्यांनी महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. क्षेमा जोश (ई.एफ.एल.यु, हैदराबाद) यांनी भाषेच्या माध्यमातून बहुभाषिक विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल, आणि याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले आणि डॉ. कल्याणी वल्लत (वल्लभ एज्युकेशन प्रा. लिमिटेड, केरळ) यांनी, भिन्न क्षमता असूनही सर्व विद्यार्थी आणि अध्यापकामध्ये सर्वसामावेशक शिक्षण कशा प्रकारचे उपयोगी ठरते, याविषयी मार्गदर्शन केले.
अशा विविध सहा सत्रामधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य आणि परिषद निमंत्रक डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, संघटक सचिव डॉ.एल.व्ही.पद्मारानी राव, व समन्वयक डॉ. अजय टेंगसे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. माधव दुधाटे, डॉ.कैलास इंगोले, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.चेतन देशमुख, डॉ. किरण देशमुख, डॉ. माधव पुयड यांनी सहकार्य केले.
या दोन दिवसीय परिषदेचे आभार डॉ.रत्नमाला म्हस्के यांनी मानले. या परिषदेला विद्यार्थी, संशोधक, आणि प्राध्यापक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. परिषदेस सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.व्यंकटाचार्यलू यांची विशेष उपस्थिती होती.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, लेखापाल अभय थेटे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे, सेवानिवृत्त प्रा.सु.ग. जाधव आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.