यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनास सुरुवात

नांदेड(प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ परीक्षेच्या ऑनलाईन मूल्यांकनास नांदेड येथील विभागीय केंद्रात सुरुवात झाली आहे. विभागीय केंद्रात पहिल्यांदा ऑनलाइन पेपर मूल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली माहिती विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ.यशवंत कलेपवार यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या हिवाळी परीक्षा दिनांक 7 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न झाल्या या परीक्षेचे पेपर मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली असून या अगोदर पेपर मूल्यांकनाचे काम नांदेड जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा इंटरनेट सुविधा संगणक सुविधा उपलब्ध आहे तेथे देण्यात येत होते .परंतु पेपर ऑनलाईन पद्धतीने तपासताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांच्या विशेष प्रयत्नातून ऑनलाइन म्हणून संमंत्रकासाठी जवळपास ८० संगणक संमंत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहेत .
शिवाय उपविभाग लातूर ऑनलाइन मूल्यांकन केंद्रावर २० पुरविण्यात आले आहेत. विभागीय नांदेड केंद्र येथे पेपर मूल्यांकनाचे काम सुरू असून पेपर मूल्यांकन संचालक डॉ. दिग्विजय देशमुख तांत्रिक सहाय्य मुंजाजी कदम, तांत्रिक सल्लागार आईन्स्टाईन मुंडे, विशेष सहाय्य विकास पावडे ,शेखर जगताप, दिलीप थोरात ,अविनाश कोलते, नितेश देशमाने, विभागीय कार्यालयाचे पदाधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने मूल्यांकनाचे काम व्यवस्थित रित्या पाडत आहे असे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कल्लेपवार यांनी सांगितले.