श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयात मैदानी क्रिडा स्पर्धेचे आयोजन.

mcr.news / manawat
———————————————
मानवत येथील श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालया मध्ये प्रजासत्ताक दिना निमात्त विविध मैदानी खेळ व क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज विद्यालयाचे मुख्याध्यापक पूंडलिक कजेवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक व खेळाडूंची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालया मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी.एम. कजेवाड पर्यवेक्षक श्री केकान सर, क्रीडाशिक्षक श्री गोविंद जोशी सर, श्री पतंगे सर, श्री वाघमारे सर, श्री गजमल सर, श्री रेडेवाड सर, श्री डांगे सर, श्री बारहाते सर, श्री घनाटे सर आदींची या वेळी उपस्थिती होती.
.