ताज्या घडामोडी

महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 20 जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील महारेशीम अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून केली आहे.

सन 2025-26 मध्ये महारेशीम अभियान अंतर्गत तुती लागवड, मनरेगा सिल्क, समग्र दोन योजनेअंतर्गत तसेच वैयक्तिक नवीन तुती लागवड करणास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महा रेशीम अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

९जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामकृष्ण इमारत, दुसरा मजला, एम एफ होंडा शोरूमच्या बाजूला, जॉन डियर सर्विस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड येथे संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुती लागवड करिता सभासद नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते दिनांक 15 जानेवारी रोजी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी शिंदे, रेशीम विकास अधिकारी पी. बी.नरवाडे, क्षेत्र सहाय्यक पी. यु. भंडारे, ए. एन. कुलकर्णी, एन. वाय.कोरके, ए.बी.यलकटवाड, दत्ता भुसकटे, प्रसाद डुबुकवाड उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.