ताज्या घडामोडी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Correspondent / Anil chavan
mcr.news / manawat
—————————————————

दि . १२ जानेवारी २५ रोजी ‘ स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जयंती निमत्त मानवत येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री पी. एल. बेले आदर्श सेवानवृत्त मुख्याध्यापक यांनी केले. यावेळी सर्व प्रथम दीप प्रज्वलन व माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करूण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांचे नव युवकांना आवाहन या विषयावर किशोरजी तुपसागर यांनी ऊकृष्ट रित्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी कार्य किती महान आहे यावर सविस्तर पणे माहीती दिली नव ऊद्योजक विलास नवघरे, महादेव जावळे , ‘ शिवराज मुंडे , व लक्ष्मण भोकरे यांचा सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आय . टी आय ) परभणी येथे जिल्हास्थरावर आयोजीत तंत्र प्रदर्शनात अंध व्यक्ती साठी ‘स्मार्ट स्टिक ‘ हा नावीन्य पुर्ण प्रयोग मानवत औद्योगिक प्रशिक्षण ( आय . टी .आय . ) संस्थेने जिल्हा स्थरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला या साठी निदेशिका आश्वीनी नाटकर मॅडम यांचे मार्गदर्शना खाली सहभागी प्रशिक्षणार्थी रक्कमाजी मुलगीर ‘ तेजस कांबळे ‘ व सुरेश पवार यांचा ही गौरव याच कार्यक्रमात करण्यात आला. तसेच या वेळी संस्थेत नव्याने रुजू व नियमीत झालेले निदेशक शिवलींग कुंभार ‘ गुरुस्थळे ‘ परमेश्वर गीरी व सफाईगार गवारे यांचे स्वागत ही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख ऊपस्थिती निलेश पवार केंद्र प्रमुख सावरगाव व आदर्श शिक्षक किशोरजी तुपसागर यांची या वेळी प्रमूख उपस्थिती होती. गट निदेशक कल्याण पटेकर यांचे नियोजन व मार्गदर्शन नुसार निदेशक किशोर जाधव ‘ संदेश झाडे ‘ मुख्य लिपिक मंगेश मूळे, ‘वरीष्ठ लिपीक श्रीकांत भोसीकर, श्रीमती भोईर मॅडम यांनी सर्व स्पर्धा आयोजना साठी जबाबदारी पुर्ण केली तर निदेशक ‘वल्लमवाड ‘ आनंदा जगाडे ‘ भांडारपाल श्री रोकडे सर गट निदेशक कल्याण पटेकर निदेशक सोनवळकर यांनी विविध कार्यक्रमाचे व विविध खेळ व स्पर्धा आयोजना साठी निरिक्षक / पंच म्हणून योगदान दिले
कार्यक्रमाचे नियोजन सुत्रसंचलन व आभार प्रदर्श निदेशक श्री संजय पवार सर यांनी केले सर्व क्रीडा स्पर्धा व ऊद्योजतगा प्रेरणा कार्यक्रम यशस्वी केल्या बाबत सोनपेठ ‘ पाथरी व मानवत संस्थेचे प्राचार्य पद यशस्वी रित्या सांभाळणारे प्रभारी प्राचार्य सी .सी . देशपांडे सर यांनी यावेळी सर्वांचे कौतूक केले.

….

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.