आशा मावळली , शेतकर्यावर आत्महत्या करण्याची पाळी पांढऱ्या सोन्या बरोबर तूरीचे भाव घसरले
तूरीला मानवत मार्केट मध्ये सात हजार पन्नास रूपये भाव.

मानवत / प्रतिनिधी.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्व मातीमोल झाले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापसाचे फार मोठे नुकसान झाले नदी ओढ यांच्या काठावरील जमीन खडून गेल्यानl परिणामी उत्पादनात मोठी घट झाली दोन वेचणीतच कापसाच्या पट्ट्या झाल्या त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी आशा होती नगदी पीक पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाचे तालुक्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते यंदाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन कापूस पिकाची पेरणी लागवड केली सुरुवातीला मान्सून स्थिती चांगली असल्याने पिकांची वाढ ही जोमात झाली त्यामुळे शेतकऱ्यांनाही खर्च करण्यात मागे पुढे पाहिले नाही वेळेवर पाऊस पडत असल्याने पिके बहारली परिणामी शेतकऱ्याकडून उत्पादन वाढीची शक्यता वर्तविली जात होती त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी आशा होती मात्र आधी ही समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे कापसाच्या उत्पादनात यंदा अतिदृष्टीमुळे घट झाली होती आलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हंगाम संपत आला तरी कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांची आशा मावळली असून पांढरे सोने व तूर कमी दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागत असल्याची स्थिती तालुक्यात दिसून येत आहे
***