ताज्या घडामोडी
माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत यांच्या हस्ते ज्ञानेश्वर डोंगरे यांचा सत्कार

नांदेड:( दि.१२ जून २०२५)
महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी.पी. सावंत यांच्या हस्ते स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर हरिदास डोंगरे यांचा ४३ व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जगदीश कदम, प्राध्यापक चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि यशवंत महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. ए.टी.सूर्यवंशी, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, किशोरसिंह ठाकुर, अशोकअण्णा कुकुटला यांनी देखील ज्ञानेश्वर डोंगरे यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.