ताज्या घडामोडी

सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येचा रयत क्रांति संघटनेच्या वतीने निषेध.

Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
———————————————

आज रयत क्रांति संघटनेच्या वतीने संतोष देशमूख यांच्या हत्त्येचा निषेध व्यक्त करूण मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन मानवत तहसिलचे तहसिलदार यांना देण्यात आले असून अशा घटनेमूळे महाराष्ट्राला काळीमा लागत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्रातील होत असलेल्या हत्या थांबण्या बाबत व सरपंच संतोष देशमूख यांना न्याय देऊन मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी रयत क्रांति संघटनेच्या वतीने एका निवेदना द्बारे करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रा मध्ये, सध्या हत्येच्या घटनां मध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे. अतिशय दुर्दैवी शाहू फूले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारे आहे. संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयत क्रांती संघटना तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. अशा घटना समाजात अस्वस्थता पसरवणाऱ्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाहीत. महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला आमची ठाम मागणी आहे की, हत्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत. अशा गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगती न्यायप्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम संदेश पोहोचेल. रयत क्रांती संघटना या प्रकारच्या घटनांना पूर्णपणे विरोध करते आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटीबद्ध राहील. आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुन्हा एकदा शांततेचा, सौहार्दाचा आणि न्यायाचा आदर्श बनवू या. यावेळी निवेदन देताना उपस्थित रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार,जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर नाना घाटुळ,शाखा प्रमुख जनार्धन आवचार, सोपान आवचार,संतोष आवचार,रामेश्वर साबळे,अंकुशराव बारहाते,शाम कबले, गोपाळ शिंदे,गोविंद बोबडे,भगवान आवचार, शिवाजी आवचार,दिनेश आवचार आदीनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.