ताज्या घडामोडी

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन

Correspondent /Anil Chavan
mcr.news / manawat
————————————————

सेलू येथील संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत समारोहाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ संगीतरसिक गोविंदभाऊ जोशी,प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, डॉ. रामराव रोडगे,माजी नगराध्यक्ष विनोदजी बोराडे, यशवंत चारठाणकर,नंदकुमार परतानी,अँड.लक्ष्मिकांत सुभेदार,संयोजक महेशराव खारकर, श्रीकांत उमरीकर, मोहन खापरखुंटीकर उपस्थित होते.


*नृत्याविष्काराने शुभारंभ*
संभाजीनगर येथील महागामी गुरूकुलाच्या विद्यार्थिनीने शास्त्रीय नृत्य सादर केले.शितल भांबरे,सिद्धी सोनटक्के,.राधिका बॅनर्जी,प्रतिमा तुपे यांनी प्रारंभी कृष्ण नामावली सादर केली .पं. बिरजूमहाराजांची रचना,झपतालाचे लक्षणगीत सादर केले.कलावंतांचा सत्कार सुनंदा कुळकर्णी,वर्षा जोशी,सुरेखा चारठाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. बाल कलाकार ईशीता अतूल कुळकर्णी हीने आपली कला सादर केली.
*तबला सोलो वादन*
पुण्याचा युवा कलावंत यती भागवत यांचे तबला सोलो वादन झाले.त्याच्या प्रस्तुतीकरणास रसिकांचा प्रतिसाद मिळाला. यश खडकेनी त्यांना अतिशय अनुरूप साथसंगत केली.
*सरपोतदारांचा काफी कानडा*
संगीत समारोहाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता यशस्वी सरपोतदार(पुणे)यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरूवातीला राग काफी कानडाचे जोरकस प्रस्तुतीकरणं केले.त्यानंतर नवकौस रागात तराना गायला. साथसंगत करणा-या यश खडके व यती भागवत यांनी गायनाला अधिक रंजक बणविलं.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर विश्वामित्रे यांनी कलावंतांचा परिचय अजित मंडलिक यांनी तर आभारप्रदर्शन मोहन खापरखुंटीकर यांनी केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.