कोल्हा ग्राम पंचायत कार्यालयामध्ये “जागतिक जल दिन मोठ्या ऊत्साहात साजरा
जल प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे. कोल्हा येथे दिनांक २२ मार्च रोजी कोल्हा ग्राम पंचायत कार्यालया मध्ये जल जिवन मिशन अंतर्गत जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. परभणी जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जागतिक जल दिना निमित्त १६ मार्च ते २२ या कालावधीत जागतिक जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या नुसार मानवत तालुक्यातील मौजे कोल्हा येथील ग्राम पंचायत कार्यालया मध्ये जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. या वेळी सर्व सन्माननिय ग्राम पंचायत सदस्य यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच गावात जल जिवन मिशन अंतर्गत असलेल्या कामांची विस्तृत माहिती यावेळी सर्वाना देण्यात आली.
कोल्हा ग्राम पंचायत कार्यकारिणी मंडळास टेक्नोस्पर्ट संस्थेचे श्री. प्रवीण नरवाडे यांनी जल प्रतिज्ञा दिली. यात पाण्याचा प्रत्येक थेंब हा जीवनाचा घटक असुन गावातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा मला अभिमान आहे, त्याची जपवणुक करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव तत्पर असेल. तसेच गावात पाण्याचा बेदखल वापर तात्काळ थांबवुन गावकऱ्यांना तसे करण्यापासुन परावृत्त करेन. गावाच्या शेतातील घरातील व अंगणातील पाणी बाहेर वाहुन जाणार नाही याची मी काळजी घेईल अशी सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी जल प्रतिज्ञा घेतली व अभिवचन दिले. या जल प्रतिज्ञा मध्ये मानवत पंचायत समितीचे माजी सभापती नारायराव भिसे पाटील , कोल्हा ग्राम पंचायतचे सरपंच रामचंद्र गायकवाड, उपसरपंच रमेश तारे पाटील , ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिसे पाटील, प्रमोद तारे पाटील ,अर्जुन ढकरगे, माजी सरपंच राजेभाऊ भिसे पाटील , सुरेश राऊत, कोल्हा ग्राम पंचायतीचे सेवक बाबासाहेब भिसे, वैभव भिसे, मानवत पंचायत समितीचे महेंद्र डोंगरे, टेक्नोस्पर्ट संस्थेचे प्रविण नरवाडे व शेख जमील यांच्या सह यावेळी कोल्हा ग्राम पंचायतीचे सन्माननिय सदस्य व नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***