https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या वतीने शहरात औषध फवारणी अभियान प्रारंभ.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांच्या कडून उपाय योजना म्हणून शहरातील रस्ते, नाल्या, मोकळ्या जागा यामध्ये शहरातील गोंधळ गल्ली,लाड गल्ली,राज गल्ली,
बांगड प्लांट,गालिब नगर,
शिवाजी नगर, पंचवटी,कैलास नगर, पेट मोहल्ला सडक,
आंबेगाव नाका, चनवार मोहल्ला,
बुद्ध नगर, खंडोबा रोड, खंडोबा मंदिर परिसर, झारे गल्ली,माळी गल्ली, कडतन गल्ली,सावता माळी रोड इत्यादी ठिकाणी औषध फवारणी अभियानाचा प्रारंभ केला असून शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे रोगराई दुर्गंधी शहरात पसरू नये तसेच जीवघेणे जीव जंतू तयार होऊ नये तसेच त्यांचा 100% र्‍हास व्हावा. यासाठी मानवत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून औषध फवारणी करण्यात येत आहे.

श्रीमती कोमलताई सावरे मुख्याधिकारीमानळत नगर परिषद मानवत यांनी बोलताना सांगितले की नगर परिषदेच्या सर्व सोयी सुविधा सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचाव्यात हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. नगर परिषदेच्या वतीने आरोग्य स्वच्छता सुंदरता स्वच्छ पाणी पुरवठा इत्यादी मूलभूत सुविधा पुरविण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. सर्व नागरिकांचे आरोग्य आनंदी व निरोगी रहावे यासाठी नगर परिषद प्रशासन तत्परतेने काम करत आहे. यासाठी मानवत नगरपरिषदेच्या वतीने एक टास्क फोर्स तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी बोलतांना दिली. तसेच शहरातील नागरिकांना आवाहन केले की आपले घर, दार व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नगर पालिकेस सहकार्य करावे व आरोग्यास धोका होईल असे कुठलेही प्रदूषण अस्वच्छता होऊ देऊ नये. नागरिकांनी स्वच्छ घर स्वच्छ अंगण ही संतांची शिकवण अंगी करावी व जीवन आरोग्यमय सुंदर होईल याकडे लक्ष द्यावे. या कामी नगरपरिषद मानवत चे स्वच्छता विभागातील स्वच्छता
निरीक्षक श्री मुंजाभाऊ गवारे तसेच त्यांचे सर्व सहकारी अधिक परिश्रम घेत असून परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704