https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

हजारो मानवतकर व्यावसायीकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या दालनात.* *न्याय मिळण्यासाठी शिवसेनेसह सर्व किराया धारकांचा आर्त टाहो

मानवत / प्रतिनिधी.

गेल्या अनेक दशकापासून मोकळ्या जागेवर *(टपरी )* ऊभारून १०x८ च्या जागेवर आपल्या छोटा रोजगार उभारून संसार रूपी गाडा चालविण्यार्‍या हजारो भाडे करूणी आपल्या परिवारा बरोबरच नगर पालिकेचे सर्व नियम सांभाळून नगर रचना विभागाच्या कर आकारानूरार नियमा प्रमाणे कर भरना करून मानवत नगर परिषदेचे उत्पन्न वाढीत , खारीचा वाटा म्हणून हातभार लावला जात आहे.
पण डोक्यात हवा गेल्या प्रमाणे सामान्य जनतेच्या अर्थीक बजेट लक्षात न घेता व मानवत व्यापार पेठेतील दौलनअवस्था लक्षात न घेता *त्रिसदस्यता* बैठकीत भाडे वाढ करून मानवतकरांच्या मानेवरच कूर्‍हाड चालविण्याचा केवीलवाणा प्रकार मानवत नगर परिषद प्रशासनाने सूरू केल्यामूळे भयभित मानवतकरांनी परभणी जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून जिवन मरनांचा प्रश्न मांडला, भाडे वाढ सध्या न पडवडणारी असून शेकडो हात बेकार होण्याची शक्यता आहे .तर या अगातूंक भाडेवाढीमूळे अनेकांचे संस्कार उघड्यावर आणण्याचे कार्य लोक कल्याणकारी मानवत नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे.
याकडे जिल्हाधिकारी *रघूनाथ गावडे* यांनी न परवडणारी नियमबाह्य भाडेवाढ या प्रश्नाकडे लक्ष देऊन हजारो मानवतकरांच्या जिवनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी हजारो मानवतकरांमधून केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 28-3-24 रोजी मानवत शहरातील मोकळ्या जागेतील किरायदार व गाळेधारक यांचा नियमबाह्य किराया वाढ करण्यात आल्याकारणांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले मानवत नगर परिषदेच्या जागेतील किरायदार गाळेधारकांना चारपट व काही जणांना दुप्पट पेक्षा जास्त केला आहे. तर मोकळ्या जागेवरील किरायदारांना अडीच पट पेक्षा जास्त किराया वाढविण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याकारणाने यावर्षी बाजार पेठेमध्ये मंदी आहे. त्यामूळे जिल्हातील शेतकरी आत्महत्याकडे वळला आहे. या मंदीच्या काळात नगरपरिषद मानवत येथील सर्व किरायदार मोठ्या कसरतीने व्यवसाय करून नगर परिषद मानवतचा किराया भरत आहेत.
मानवत बाजारपेठेत शुकशुकाट, असल्या कारणाने पहिलाच किराया थकीत आहे. अशा परिस्थितीत मानवत नगर परिषद प्रशासनाने किरायात वाढ करणे म्हणजे किरायादाराला उध्वस्त करणे होय.
मानवत शहरातील *80 ℅* व्यापारी हे पाथरी येथे अल्पदरात दुकाने उपलब्ध होत आहेत व तेथे बाजार पेठही चांगली असल्या कारणाने अनेक व्यापारी स्थलांतरित झाले आहेत. यामुळे मानवत शहराच्या व्यापार पेठेवर परिणाम झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी मानवत नगर परिषद प्रशासनाची नियमबाह्य किरायादर वाढ मागे घेऊन किरायदारांना सहकार्य करावे ही विनंती यावेळी दिलेल्या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव यांच्या सह जिल्हा सचिव रामराजे महाडीक,तालुका प्रमुख माणिकराव काळे पाटील,मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, सुधाकर मोरे, मधुकर खटले, मनोज दहे, सुभाष पानझाडे, दामोदर रासवे. यांच्या सह सर्व गाळेधारक , किरायदार व मोकळया जागेतील किराया धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704