जिल्हास्तरीय स्काऊट आणि गाईड मेळाव्यात जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे घवघवीत यश
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील रत्नापूर कला , वाणिज्य महाविद्यालय रत्नापूर येथे दिनांक 28 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत 42 वा जिल्हास्तरीय स्काऊट्स आणि गाईड मेळावा संपन्न झाला .
या मेळाव्यात मानवी मनोरे, बिन भांड्याचा स्वयंपाक ,बँड स्पर्धा, तंबू उभारणी स्पर्धा ,पथसंचलन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या .
यातील पथसंचलन या स्पर्धेत जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवतरोड शाखेतील आझाद स्काऊट गाईड पथकातील मयूर संघाने उत्कृष्ट संचलन करून तृतीय क्रमांक मिळवला त्या बद्दल परभणी जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड विभागा तर्फे सर्व विद्यार्थी स्काऊटर आणि गाईडर व शाळेचा सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था सचिव तसेच आंतरराष्ट्रीय स्काऊटर प्राध्यापक नितीन लोहट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील आव्हानात्मक मेळाव्यासाठी मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी स्काऊटर म्हणून राजकुमार पुंडगे व गाईडर म्हणून कविता भिसे यांनी विद्यार्थ्यां बरोबर सहभाग घेतला तर यशस्वी विद्यार्थ्यांचे विभाग प्रमुख अशोक दुधारे पर्यवेक्षक सुरेश भिसे, राजू वाघ व कौशल पामे यांनी यावेळी सर्वांचेॅॅ कौतुक केले.
**