https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नागरिकांच्या समस्या निवारा अन्यथा आंदोलन उभारू शिवसेनेचा ईशारा.शहरप्रमूख }अनिल जाधव.

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक ११ मार्च रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानवत नगर परिषदला निवेदन देण्यात आले असून या मधे मानवत शहरात प्रधानमंत्री घरकुल आवास योजना लाभार्थ्यांना अडवणूक होत आहे. ज्या लाभार्थ्यांनी नियम व अटी पूर्ण करून बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्यांना हेतू पुरस्कार (हप्ते) दिल्या जात नाही. ज्यांनी बांधकामच सुरू केलेले नाही अशा लाभार्थ्यांना 4 (चार) हप्तेे निधी देण्यात आलेला आहे.
या सर्व चुकीच्या (नियमबाह्य) कामाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी नियम व अटी पुर्ण केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ निधी (हप्ते) त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात यावी आणि प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन लाभार्थी यादी तात्काळ मंजूर करण्यात यावी तसेच चौमोटाच्या विहिरीजवळील (झारे गल्ली) येथे नालीच्या घाण पाण्यामुळे शेपटीच्या अळ्या नागरिकांच्या घरात जात असून त्यामुळे लहान मुलांचे व वयोवृध्द व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यावर उपाय करण्यात यावा. खंडोबा टेकडी हा परिसर उंच असल्या कारणामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून वणवन फिरणे होत आहे. त्यामुळे पाण्याचा थोडासा प्रेशर वाढवून पाणी सोडण्यात यावे.
या सर्व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी नगर पालिका प्रशासनावर राहिल याची नोंद घ्यावी.
निवेदन न.प.चे.(os) शिंदे साहेब बांधकाम विभागाचे अनुवर साहेब पाणी पुरवठा विभागाचे आडसकर यांनी स्वीकारले.
या वेळी दिलेल्या निवेदनावर *अनिल जाधव ( शिवसेना शहर प्रमुख मानवत )* , आप्पा भिसे (उपशहर प्रमुख मानवत) , शंकर तर्टे , सुरेश बनगर , दीपक कुमावत(सोशल मीडिया शहर प्रमुख) , कुंडलिक थिटे , युसूफ खदीर , आत्तार , नवनाथ गुडटवार , तुकाराम दशरथे , महादू बालकुंड , कृष्णा वाघे , नरेश तर्टे , हरी चटाले , श्रीराम गिराम , कैलास धुमाळ , योगेश चव्हाण , शंकर बागडे , ज्योतिबा बालकुंड , मारुती बोलेवार ,योगेश दशरथे , रामेश्वर जाधव , गोपाळ दशरथे , ज्ञानेश्वर विठ्ठल माने , कमलाकर भायेकर , राजू परभणकर , अशोक गिराम , हमीद कुरेशी , ऋषिकेश गवळी , बालाजी रासवे , एकनाथ गुडटवार , महादू दहीहंडे , आबाजी हेकारे , आंसीराम दशरथे , बाबासाहेब दशरथे आदींच्या सह्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704