https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

किस्ना’ कथासंग्रहात अवतीभोवतीच्या माणसाचं जीवन अधोरिखित- कवी इंद्रजीत भालेराव (पत्रकार भारत दाढेल यांच्या कथासंग्रहाचे थाटात प्रकाशन)


नांदेड: साहित्यात माणसाचं जीवन जगणं खऱ्या अर्थाने चित्रीत झालं पाहिजे. तेच साहित्य जिवंत साहित्य म्हणून वाचनीय ठरते हाच धागा घेऊन कथाकार भारत दाढेल यांनी जगलेले पाहिलेले आणि अनुभवलेले माणसांचे चित्र किसना या कथासंग्रहातून समर्थपणे मांडले आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी केले.
रविवारी पत्रकार भारत दाढेल लिखित यांच्या ‘किस्ना’या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा देवकृपा लॉन्स, पूर्णा रोड नांदेड येथे पार पडला.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते अनिल मोरे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके , डॉ.मारोती कसाब ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे,जूनियर जॉनी लिव्हर रामेश्वर भालेराव, डॉ. विठ्ठल पावडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉक्टर गोविंद नांदेडे म्हणाले की, मराठी साहित्यात अण्णाभाऊ साठे यांनी ज्या पद्धतीची पात्रे साहित्यातून उभे केली त्याच धर्तीची पात्रे भारत दाढेल यांच्या कथासंग्रहातून वाचकासमोर प्रतिबिंबित होतात. त्यांच्या कथासंग्रहात साहित्यातील तोच तोच पणा जाणवत नसून अगदी वास्तवपणे ते कथा चित्रण करतात.
सिने अभिनेता अनिल मोरे यांनी किस्ना या कथासंग्रहावर भाष्य करताना सांगितले कथासंग्रह असताना वाचक त्या कथेत रमून जातो पुढे काय होईल ही उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये येत राहते. लेखकांच्या जीवनात जीजी पात्रे आली त्यांनी पाहिली तीच पात्रे समाजापुढे या कथासंग्रहातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
डीपी सावंत म्हणाले की, किसना हा कथासंग्रह समाजापुढे एक आदर्श देऊन पुढे नेणार आहे. आपल्याच माणसाचे जीवन समाजापुढे आणून शब्दबद्ध करण्याचा लेखकाचा हा प्रामाणिकपणा वाचकांना प्रेरित करणार आहे.
प्रकाशन सोहळा यशस्वीतेसाठी सुनील लोंढे, सचिन मोहिते, प्रा.शरद वाघमारे, अविनाश चमकुरे,प्रा.सतीश वागरे, डॉ. प्रवीण सेलुकर,आदी संयोजक मंडळ यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन प्रा.धाराशिव शिराळे यांनी तर आभार सोनू दरेगावकर यांनी केले. प्रकाशन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704