https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्राचीन भारतीय राजवटीमधील प्रशासनात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची. -डॉ.कमल लोहगावकर

नांदेड:(दि.१५ फेब्रुवारी २०२४)
प्राचीन भारतातील राजवटीमधील प्रशासनात स्त्रियांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. स्त्रियांना फार मोठा प्रशासनाचा गौरवशाली वारसा आहे. तो इतिहास अभ्यासकांनी व विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे; असे उद्गार यशवंत महाविद्यालयाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ.कमल लोहगावकर यांनी यशवंत महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित विस्तारित व्याख्यानाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ‘प्राचीन भारतीय स्त्रिया व प्रशासन’ या विषयावर बोलताना काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभागप्रमुख प्रो.डॉ.शिवराज बोकडे होते.
पुढे बोलताना डॉ.कमल लोहगावकर यांनी, प्राचीन भारताच्या इतिहासातील राज्यकर्त्या स्त्रिया, पालक स्त्रिया ,संयुक्त राज्यकर्त्या स्त्रिया, विरांगणा, प्रशासनातील विविध स्तरावरील स्त्रिया अशा स्त्रियांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोपात डॉ.शिवराज बोकडे म्हणाले की, स्त्रियांनी प्राचीन काळापासून कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्धाराच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही समाजाचे महत्त्वाचे अंग आहेत .स्त्रियांना मानसन्मानाबरोबर कर्तुत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्या महत्त्वाची भूमिका बजावतील; एवढेच नव्हे तर आज विविध क्षेत्रांमध्ये अनेक आघाड्यावर स्त्रिया अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मंचावर डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे), प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि डॉ.साईनाथ बिंदगे उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे )यांनी करून दिला.
प्रारंभी कु.पूजा वाठोरे हिने स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले तर प्रा.राजश्री जी.भोपाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता आणि कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, संशोधन विकास समितीचे समन्वयक डॉ.एम.एम. व्ही.बेग, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704