मानवत येथे महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा
मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथे दिनांक १२ फेब्रुवारी रोजी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पद्ममशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय यांच्या जन्मोत्सव सोहळा हा श्री. महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने समाज मंदिरामध्ये मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी मानवत शहरातुन भव्य दिव्य अशी मिरवणुक काढण्यात मिरवणुकीत भगवंताचा नामघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात तरुण अबाल वृंध वारकरी संप्रदाय मोठया संख्येने सह भागी झाले होते.
तर विशेष म्हणजे या वेळी महिला भजनी मंडळ ही सहभागी झाले होते सकाळी सात ते नऊ वेळेत महापूजा करण्यात आली.
व त्यानंतर श्री. महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. तर दुपारी भव्य दिव्य अशी शोभा यात्रा मानवत शहरातुन काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्ममशाली समाजाचे अध्यक्ष श्री. मारोती बोलेवार, उपाध्यक्ष श्री. नरसय्या कुरपटवांर, सचिव श्री. पांडुरंग चामलवार, यलप्पा रायपेल्लीवार, सोनाली सब्बेवार, लक्ष्मण गाजुलवार,फकीरराव तुम्मेवार,सत्यनारायण रायपेल्लीवार, एकनाथ गुद्दटवार, राम चिट्टेवार, ज्ञानेश्वर रायपेल्लीवार, राजलिंग दासेवार, संजय बत्तीनवार, शंकर कोमलवार,गणेश सैबेवार, गंगाधर बाचेवार, रमेश मंगलपेल्ली, दिपक बत्तीनवार, दिनेश बाचेवार, राजू बुरलेवार, किसन कुरपटवार, तुळशी दास यक्कदेव, गणेश बोलेवार, नवनाथ गुद्दटवार, पांडुरंग चामलवार, राजू बुरेलवार, आशा गाजूलवार, कमल बानलवार, रेखाबाई गुड्डेवार, पद्माबाई दासेवार, सुरेखा कुरपटवार, रेणुका रायपेल्लीवार, शारदा रायपेल्लीवार, विजया रायपेल्लीवार, अश्विनी बुरलेवार, रेखा तुम्मेवार, रेणुका सोनवणे, रेणुका मंगलपेल्ली, राणी बुरलेवार,लक्ष्मीकांत चामलवार, नंदा चामलवार,लता येल्लेवार, गौरी रायपेल्लीवार, सुनिता बाचेवार, सुरेखा शातरवार, मिरा गाजुलवार, मिरा निलपत्रेवार यांच्या पद्मशाली समाज बांधव आणि नवयुवक मार्कंडेय जन्मोत्सव समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. तर मिरवणुकीत सर्व महिला व पुरुषांनी पिवळे वस्त्र परिधान करून मोठया संख्येने सहभाग नोंदविला होता.
***