https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्काऊट गाईड जिल्हा मेळावा पूर्वतयारी संदर्भात मानवत येथे नियोजन बैठक संपन्न

मानवत / प्रतिनिधी.मानवत येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात २४ जानेवारी रोजी मानवत गट साधन केंद्राचा सभागृहात स्काउड गाईड जिल्हा मेळावा पूर्व तयारीचा नियोजना संदर्भात महत्वाची बैठक पार पडली.
यावेळी विविध समित्या गठीत करण्यात या वेळी बैठकीचे प्रमुख अतिथी जिल्हा संघटक श्रीमती. माधुरी जवणे, मानवत सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख शिरीष लोहट केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख कान्होजी लहीरे यांची उपस्थिती होती. या महत्वपूर्ण बैठकित निवास व्यवस्थापन समिती, भोजन समिती, व्यासपीठ व्यवस्थापन समिती, पाणी पुरवठा समिती, स्वछता समिती प्रसिद्धी व प्रचार समिती, मंडप विद्यूत पुरवठा समिती, परीक्षण समिती, बक्षीस व प्रमाणपत्र वितरण समिती आणि सूत्रसंचालन समिती अशा विविध समित्या गठीत करुन त्या समित्यानी योग्य रित्या आपली भूमिका आणि कार्य पार पाडावे अशा सूचना बैठकित देण्यात आल्या.
यावेळी बैठकीस केंद्र प्रमूख शिरीषजी लोहट, कान्होजी लहिरे, विशाल कोल्हे, माणिक पुरी, संजय पक्वाने, विलास राठोड, बालाजी कवडे, दिलीप लाड, माणिक घाटूळ, ज्ञानेश्वर जलशिंगे, संतोष पांचाळ, संजय गिरी, विलास मिटकरी, अनिल चव्हाण, प्रविणजी घागरे, किशोरजी तूपसागर, विश्वनाथ बुधवंत, पुंडलिक काजेवाड, श्रीमती. कुसुम कनकुटे, दिलीप सोनटक्के, नरेंद्र कांबळे, राजेश चव्हाण यांच्या सह नियोजन समिती सदस्यांची उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704