https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्रतिभा निकेतन महाविद्यालयात “कम्युनिकेशन आणि आयटी स्किल्स प्रमाणपत्र अभ्यासक्रमास ” सुरूवात

नांदेड, 15 जानेवारी, 2024 प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथील इंग्रजी विभागाने कम्युनिकेशन आणि आयटी स्किल्स या 40 तासांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे. आजपासून, 15 जानेवारी 2024 सुरू झालेला हा अभ्यासक्रम 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे.

उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर गंगाखेडकर होते. प्रमुख पाहुणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अभ्यास मंडळाचे मान्यवर सदस्य डॉ. भगवान गुंजालवाड यांनी अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. स्वाती तांडे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या डिजिटल-चलित जगात आवश्यकता असलेल्या इंग्रजी संभाषण आणि आय. टी. कौशल्य यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि समाविष्ट अभ्यास घटकांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. भगवान गुंजालवाड यांचे सध्याच्या जागतिक परिस्थितीत इंग्रजी संभाषण कौशल्याचे महत्त्व या विषयावरील व्याख्यान उद्घाटन समारंभात झाले.

प्रा. मिर्झा जुनैद यांनी आभार मानले. कार्यक्रमा च्या यशस्वीते करिता डॉ. सय्यदा रुखसाना आणि प्रा. भाग्यश्री मदेवाड यांच्यासह पवन वाघमारे, अपूर्वा पालीमकर, आर्या देव, श्री. अशोक काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगारातील आव्हानांसाठी सक्षम करतो.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704