https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्य विविध कार्यक्रम

नागपूर,प्रतिनिधी:-

१५ नोव्हेंबर म्हणजे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीच्या दिवस संपूर्ण आदिवासी जमाती करीता आंदोत्सोहाचा दिवस दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हलबा आदिवासी जमात १५ नोव्हेंबर या दिवशी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करणार आहे.

धरती आबा यांच्या संघर्ष, आदिवासींच्या अधिकारासाठी दिला गेलेला त्यांचा लढा, आदिवासींचा उत्थानासाठी दिलेले विचार हे जण सामान्यात पोहचावे म्हणून या वर्षी दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी लोकनायक रा. बा. कुंभारे विचार मंचा द्वारे धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती प्रत्येक आदिवासी हलबा बाहुल क्षेत्रात साजरी करण्याचे निर्णय घेतेले आहे.

संपूर्ण परिसर पिवळ्या पताक्यानी तसेच पिवळ्या झेंड्यानी सुशोभित करण्याचा निर्णय देखील मंचा द्वारे घेण्यात आलेला आहे.

खालील हलबा बाहुल क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येईल.

१) रा. बा. कुंभारे पुतळा, गांधीबाग सकाळी ९:०० वाजता

२) गोळीबार चौक, सकाळी ९:३० वाजता

३) समता नगर सकाळी १०:०० वाजता

४) टिमकी , भानखेडा सकाळी १०:३० वाजता

५) पोलीस चौकी , बंगलादेश सायंकाळी ५:०० वाजता

६)  प्रकाश पान मंदिर, तांडापेठ सायंकाळी ६:०० वाजता

७) जुनी मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता

८) कांजी हाऊस चौक सायंकाळी ७:०० वाजता

९) विनोबा भावे नगर सायंकाळी ८:०० वाजता

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704