आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि उपचार पद्धती लाभदायक – डॉ. अरविंद धाबे

*
नांदेड:( दि.२३ जानेवारी २०२५)
आयुर्वेदामध्ये वनस्पतींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कॅन्सर रोगाच्या निदानासाठी आयुर्वेद उपचार अत्यंत योग्य आहे. आयुर्वेदामधील औषधी वनस्पती आणि उपचार पद्धती मानवी शरीराची कोणतीही हानी न करता लाभदायक असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.अरविंद धाबे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयात पीएम: उषा सॉफ्ट कंपोनंट ऍक्टिव्हिटीअंतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे आणि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एस. बोडके यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आयुर्वेद संशोधन आणि औषध उपचारपद्धती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. एस. एस.बोडके यांनी, अतिथी व्याख्यानमालेची उद्दिष्टे विस्ताराने स्पष्ट केली आणि औषधी वनस्पतींचा प्रसार आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी पीएम:उषा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.
सूत्रसंचालन डॉ.एम.एम.व्ही.बेग यांनी केले तर आभार डॉ.सुरेश तेलंग आणि डॉ.रमेश चिल्लावार यांनी मानले.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.साहेब शिंदे, डॉ.अंजली जाधव, डॉ. सचिन पाटील, डॉ.सविता वानखेडे, डॉ. प्रियंका थोपटे, सौ. मनीषा बाचोटीकर, देविदास टर्के आणि अफसर अन्सारी यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, लेखापाल अभय थेटे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.