यशवंत वार्षिक युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न

*
नांदेड:( दि.५ मार्च २०२५)
विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी यशवंत महाविद्यालयात नवनवीन उपक्रम घेतले जातात. यशवंत वार्षिक युवक महोत्सवात मौखिक सादरीकरण, पोस्टर सादरीकरण, प्रतिकृती सादरीकरण, रांगोळी, काव्यवाचन, क्रीडा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
दि. ४ मार्च रोजी पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे विषय ‘मानव्यविद्याशाखेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता’ असे होते.
माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पीपल्स महाविद्यालयातील ज्येष्ठ परीक्षक डॉ.विकास सुकाळेंच्या हस्ते पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी स्वतः सर्व पोस्टर पाहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन तसेच विज्ञान व तंत्रज्ञान अशा तीनही विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधन विद्यार्थी अशा सर्वच स्तरावरील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या १८० होती. काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र तर काहींनी सामूहिक पोस्टर सादरीकरण केले.
मानव्यविद्याशाखेसाठी डॉ.विकास सुकाळे व डॉ.सुभाष रगडे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी डॉ.मोहन रोडे व डॉ.प्रदीप जाधव आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखेसाठी डॉ.एच.एम.कासराळीकर व डॉ.विजयकिरण नरवाडे परीक्षक होते.
स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक विषयामधील सादर केलेले वेगवेगळे विचार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया परीक्षकांनी दिली.
प्रत्येक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधन विद्यार्थी या स्तरावरील सहभागींसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन-तीन तसेच प्रत्येक विद्याशाखेत एक सर्वोत्कृष्ट हस्तनिर्मित पोस्टर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवक महोत्सव समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, स्पर्धा समन्वयक डॉ.एन.ए.पांडे, आयोजन समिती सदस्य डॉ.शिवराज बोकडे, डॉ. डी. डी. भोसले, डॉ.आर.एल.सोनटक्के, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.श्रीकांत जाधव व डॉ.मदन अंभोरे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धा आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे व डॉ.हरिश्चंद्र पतंगे, इंग्रजी विभागप्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका प्रा.डॉ.पद्मारानी राव, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.