https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “व्हॅलेंटाईन डे “लैलेशा भुरे

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला

व्हॅलेंटाईन डे
************************
व्हॅलेंटाईन डे प्रेमीजनांसाठी फारच खास असतो.कारण यादिवशी जगभरात प्रेमाची देवाणघेवाण केली जाते.एकमेकांवर किती प्रेम करतो हे शब्दातूनच नव्हे तर मुक्या भावनांतूनही सांगितले जाते.बरेच दिवस एकमेकांकडे नुसते बघून नजरानजरीचा खेळ चालू असतो.व्हॅलेंटाईन डे ला सर्व प्रेमीयुगुल वाट बघत असतात ते मनातील प्रेमाची ग्वाही देण्यासाठी.एकदा का या दिवशी प्रेमाचा प्रस्ताव मांडताना होकार मिळाला की ती आणि तो, दोघांसाठी सर्वच दिवस गुलाबी असतात.

 

 

सुरू झालेला हा प्रेमाचा प्रवास कुठपर्यंत सोबत असेल याची खात्री दोघांपैकी कुणालाच नसते.परंतु त्या शहारलेल्या दिवसांतील गोडी काही औरच असते.दोघेही एकमेकांत गुंतलेली असतात.प्रेमाचं रसायन नसानसात भिनलं असतं दोघांच्याही.प्रेम करणे तर लैला -मजनू,हिर -रांझा,रोमीयो -ज्युलीएट यांच्यापासून तर आजपर्यंत सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणार.

 

पूर्वीच्या प्रेमात एकमेकांविषयी तळमळ होती, जिव्हाळा होता.आता जग बदलले तसे प्रेमही बदलले
आहे.आजकाल लगेच प्रेम जुळते आणि लवकर तुटतेही.जोपर्यंत चांगलं चाललं तोपर्यंतच प्रेम,जरा कुठे बिनसलं की लगेच ब्रेकअप होतो.मग दोघेही विभक्त होऊन आपापल्या वाटेने निघून जातात.हल्ली तर एकमेकांवर प्रेम करायला डेटिंगवर जातात.भेटल्यावर मनं जुळली की प्रेमात पडतात,नाहीतर मग पुन्हा दुसऱ्या कुणासोबत तरी डेटींगवर जायचं.असं आहे आजचं प्रेम.
खरंतर प्रेम ही एक हळुवार,हळवी भावना असते.परंतु ही भावना कधी कधी विश्वासघाताच्या अग्नीत जळून भस्मही होते.प्रेमाची भावना शुद्ध,निर्मळ झ-यासारखी स्वच्छ हवी.हेतू शुध्द असेल तर प्रेमाने पावित्र्य राखल्या जाते.स्वत: झिजून दुस- याला सुवास देण्याची प्रक्रिया म्हणजे प्रेम.प्रेमात त्याग असतो.प्रेमासारखं सुंदर दुसरं काहीच नाही.प्रेम मनाची अप्रतिम भावना आहे.प्रेमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले तर प्रेमाच्या वाटेवरचे काटेही गुलाब होऊन जातात.
**************************
लैलेशा भुरे 🌹
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704