ताज्या बातम्या

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड

अध्यक्षपदी श्री. मोहनराव लाड तर ; उपाध्यक्षपदी सौ. कविताताई सत्यशिलजी धबडगे यांची निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरोबाजी बनसोडे, मानवत सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिरीषजी लोहट, जीपीएफ फाउंडेशनचे सदस्य श्री. सुशील उजगरे यांच्या उपस्थिती मध्ये आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. मोहनराव लाड यांची तर उपाध्यक्षपदी सौ. कविताताई सत्यशीलजी धबडगे यांची निवड करण्यात आली.
तर या वेळी उर्वरित समितीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
यात सौ. राणीताई प्रशांत गोलाईत, श्री. मनिष दत्तात्रेय सातपुते, सौ. अनिताताई बाबासाहेब शिंदे, श्री. भारत रामराव कच्छवे, सौ. दिपालीताई गणेश दहे, श्री. रामकिशन नारायण बोरबने, श्री. मोहन केशवराव लाड, सौ. कविताताई सत्यशील धबडगे, श्री. भागवत दत्तात्रय गोलाईत, सौ. रेखाताई पुरुषोत्तम सोरेकर, श्री. नारायण लक्ष्मण हरकळ, श्री. गुलाब केशवराव लाड, श्री. दिगंबर किशनराव गडदे, सौ. पुनमताई गुलाबराव लाड, सौ. शिवकन्याताई बळीराम नालंदे, यांची निवड करण्यात आली.
तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून विद्यालयातील श्री. बाबासाहेब संतरामजी पानझाडे यांची निवड करण्यात आली. या वेळी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी विदयार्थ्यांचे बहूसंख्य पालक उपस्थित होते. तसेच पालकांना अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना, त्यांचे कार्य व जबाबदारी यांची विस्तृत माहिती सांगितली तसेच वर्ग निहाय आरक्षणाची कल्पना दिली.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी विद्यालयातील श्री. दिलीप लाड, श्री. रामराव सोळंके, श्री. राजकुमार लांडे, श्री. संजय पकवाने, श्री. सुनील चौधरी, श्री. सचिन निलवर्ण, श्री. केशव गिरी, श्री. नामदेव खिळदकर, श्री. दगडूराम बोरकर, श्री. मारोती रोकडे, श्री. संजय परभणकर, श्री. संजय काकडे, श्री. विलास खूपसे, श्री. तुकाराम कोसाईतकर, सौ. उज्वला जत्ती, सौ. सत्यभामा गिरी, सौ. अनिता खरात, सौ. ज्योत्सना पौळ यांनी महत्त्वाची भुमिका बजावली तर कार्यक्रमास शिक्षक बांधवा सह पालकांची व प्रतिष्टीत नागरिकांची या वेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.

**

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button