पदवीधर सिनेट निवडणूक: महाविकास आघाडीच्या ज्ञानतीर्थ पॅनल चे वर्चस्व

नांदेड:
: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या दुसऱ्या टप्प्यातील पदवीधर अधिसभा सिनेट निवडणुकांचा निकाल दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गुरुवारी पहाटेपर्यंत घोषित करण्यात आला .
त्यात महाविकास आघाडीच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे १० पैकी ९ जण निवडून आले आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्वाचनाधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर शांतिनाथ बनसोडे निवडणूक सहाय्यक कुलसचिव रामदास बेलदेवाड, विद्यापीठातील अधिकारी तसेच शिक्षक कर्मचारी यांच्या नियोजनात निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण 41 उमेदवार उभे होते. यामध्ये खुला प्रवर्ग पाच अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक भटक्या विमुक्त एक महिला एक आणि ओबीसी एक या जगासाठी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते काँग्रेसचे ज्ञानतीर्थ पॅनल एबीव्हीपी चे विद्यापीठ विकास मंच त्यासोबतच विद्यापीठ महाविकास आघाडी संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा उमेदवार उभे केले होते दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास संपूर्ण निकाल हाती आले .
खुला प्रवर्ग१) नारायण चौधरी, २) पतंगे विक्रम, ३) पाटील युवराज)४ माने विनोद)५ मगर महेश, ओबीसी हनमंत कंधारकर, महिला शितल सोनटक्के , अनुसूचित जाती बंटी अजय गायकवाड, अनुसूचित जमाती बालाजी रेजीतवाड व भटक्या विमुक्त मधुन गजानन आसोलकर हे विजयी झाले आहेत. दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेली प्रक्रिया तब्बल २० तास चालली. दि.१७ नोव्हेंबर रोजी पहाटे पर्यंत संपूर्ण निकाल घोषीत झाले.